नवी नियमावली : जळगाव जिल्हा तिसर्या लेव्हलमध्ये : आता पुन्हा निर्बंध
नवे निर्बंध लागू : कोरोनाची वाढती संख्या आणि डेल्टा प्लस वेरियंटमुळे निर्णय
जळगाव : राज्यात कोरोना रुग्णांची सातत असलेली रुग्ण संख्या व त्यातच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने राज्य सरकारनं सर्वच जिल्ह्यांना तिसर्या टप्प्यात समाविष्ट केले आहे. दरम्यान, जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील शुक्रवार, 25 रोजी जिल्ह्यासाठी निर्बंध जारी केले असून त्याची 27 जूनपासून अंमलबजावणी होणार आहे.
असे आहेत जळगाव जिल्ह्यासाठी निर्बंध-



सायंकाळी पाच ते सकाळी पाच दरम्यान मुक्तपणे संचार करण्यास मनाई
अत्यावश्यक सेवा पुरवणारे दुकाने (मेडिकल दुकाने/वैद्यकीय सेवा वगळून) दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आस्थापना सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर शनिवार व रविवार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
शॉपींग मॉल, थिएटर्स, मल्टीफ्लेक्स, सिंगल स्क्रीन- पूर्णपणे बंद
सार्वजनिक ठिकाणे/खुले मैदाने/हॉटेल/रेस्टारंट/बार- 50 टक्के क्षमतेने व सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत व दुपारी चार ते रात्री नऊ दरम्यान केवळ पार्सल सुविधा तसेच शनिवार व रविवार पूर्णपणे बंद
लग्न समारंभ- केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यविधी- केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत
शेतीविषयक सर्व कामे करता येतील.
सर्व प्रकारचे बांधकामे सुरू ठेवता येतील
जीम/सलून/ब्युटी पार्लर/स्पा सेंटर/वेलनेस सेंटर- सुरू ठेवता येईल
माल वाहतूक व्यवस्था- सुरू ठेवता येईल
आंतर जिल्हा प्रवास- सुरू
सर्व शाळा/महाविद्यालये/शैक्षणिक प्रशिक्षण/कोचिंग क्लासेस- बंद

