शिवसेना शहर प्रमुखाची हत्या
अमरावती : शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून शस्त्रांचे सपासप वार करून हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक करण्यात आली असून एक संशयीत आरोपी पसार असल्याची माहिती पोलिस निरीक्षण रीता उईके यांनी दिली.
कट रूचून केली हत्या
शनिवारी रात्री अमोल पाटील हे आपल्या एका मित्रासोबत आशीर्वाद बारमध्ये आले असता आरोपींनी अमोलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. पोलिसांनी या प्रकरणी संदीप रामदास ढोबाळे (42), प्रवीण रामदास ढोबाळे, प्रवीण उर्फ अविनाश एकनाथ पांडे (30), रूपेश घागरे (22, सर्व तिवसा) यांना अटक केली तर एक जण पसार झाला. अमोल पाटील यांची हत्या जुन्या वादातून झाल्याचे समजते.



