फेसबुकवरील मैत्री पडली महाग : तरुणीवर लॉजमध्ये अत्याचार
अमरावती : फेसबूकवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना मूर्तिजापूरमध्ये घडली. या प्रकरणी राजकुमार अवधूत जामनिक (30, रा. टाकळी, ता. दर्यापूर) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती शहरातील 27 वर्षीय तरुणीची आरोपीशी फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर तरुणीचे आरोपीशी संभाषण वाढल्यानंतर त्याने ऑडिओ रेकॉर्डिंग केले व हे रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देऊन मूर्तिजापूर (जि. अकोला) येथे तरुणीला बोलावत तिच्यावर लॉजमध्ये अत्याचार केला. ही घटना नोव्हेंबर 2020 पासून घडली.


