रेव्ह पार्टी उधळली : रीअ‍ॅलिटी शोमधील अभिनेत्रीसह 22 संशयीतांना अटक


नाशिक : ईगतपुरी परीसरातील रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळत बॉलिवुडमधील दोन कोरीओग्राफर, तामिळ आणि काही हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींसह एका रीअ‍ॅलिटी-शोमधील अभिनेत्री मिळून एकूण 22 जणांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली. दोन खाजगी बंगल्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारख्या अंमली पदार्थांची नशा करत बॉलिवूडशी संबंधित चार महिलांसह एकूण 22 उच्चभ्रू व्यक्तींचा समुहाची पार्टी होत असल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

ईगतपुरी पोलिसात गुन्हा
10 पुरुष, 12 महिलांसह एकुण 22 उच्चभ्रू व्यक्तींचा मोठा समुह इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या आलिशान बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी करीत असताना पोलिसांनी कारवाई केली. काही महिला थेट बॉलिवुडशी संबंधित असून एक विदेशी महिलेचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही महिला इराणची नागरिक असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !