खडसे म्हणाले ; फडणवीस उत्कृष्ट विरोधी नेते ; त्यांनी राजकीय संन्यास घेवू नये
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी मुख्यमंत्री फडवणीस यांच्यातील सख्य उभ्या राज्याला ठावूक आहेत. अलिकडच्या काळात खडसेंनी फडणवीसांवर टिकेचेदेखील बाण चालवले असताना ओबीसी आरक्षणावरून पुन्हा खडसेंनी फडवणीसांवर टिकेची तोफ डागली. फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत, त्यांनी 5 वर्षे सरकारला सूचना कराव्यात, असा सल्ला एकनाथराव खडसे यांनी दिला. खडसे म्हणाले, वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर त्यांनी आपण लग्न करणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा केली मात्र त्यांनी लग्न केले.
फडणवीसांची भूमिका दुटप्पी
गत निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस यांनी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता पण ती फसवणूक होती. जोपर्यंत जनगणनेचा डाटा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अध्यादेशाला महत्त्व नाही, हे फडणवीस यांना ठावूक होते. केंद्र सरकारकडून डाटा आणला तर राज्य सरकार त्यावर काम करू शकेल. पण केंद्राकडून डाटा मिळू द्यायचा नाही, आणि ओबीसींचे आम्हीच पाठीराखे असे म्हणायचे ही दुटप्पी भूमिका फडणवीस यांची असल्याचे खडसे म्हणाले.




