मुंबई विमानतळ नामांतरासाठी 30 रोजी रेल्वे रोको आंदोलन
भुसावळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाचे संविधान असे नामांतर करण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईसह खान्देशातील 11 रेल्वे स्थानकावर 30 जुलै रोजी दुपारी दोन वाजता रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संविधान मोर्चा 1 जुलै रोजी काढण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांना मागणीसंदर्भात निवेदन देण्यात आले. संविधान मोर्चा नेतृत्व संविधान आर्मी राष्ट्रीय चीफ जगन सोनवणे व नगरसेविका संविधान आर्मी महिला आघाडी प्रमुख पुष्पा जगन सोनवणे करणार असल्याचे प्रदेश प्रचार प्रसिध्दी प्रमुख संघपाल किर्तीकर यांनी कळवले आहे.

