जळगाव महानगरपालिका कर्जमुक्तीची घोषणा फसवी : माजी मंत्री एकनाथराव खडसे


जळगाव : जळगाव महापालिकेवर 250 कोटींचे कर्ज होते ते राज्य सरकारने भरले मात्र 125 कोटी रुपये आजही महापालिका राज्य सरकारचे देणे लागते त्यामुळे आता दरमहा तीन कोटी रुपये महापालिकेकडून राज्य सरकारला द्यावे लागत आहेत त्यामुळे आधीच्या सत्ताधार्‍यांनी व तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केल्याप्रमाणे महापालिका जर पूर्ण कर्जमुक्त झाली होती तर आता हे देणे आले कुठून ? असा प्रश्‍न माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थित करीत महापालिका कर्जमुक्तीची घोषणा असवी असल्याचे सांगितले. महापौर जयश्री महाजन आणि विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांची भेट संपल्यानंतर पत्रकारांशी खडसेंनी संवाद साधला.

भाजपा नगरसेवक फुटणार
खडसे म्हणाले की, अजूनही भाजपाचे 9 ते 10 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत ते आता शिवसेनेत जातील की राष्ट्रवादीत येतील हे मी आताच काही सांगू शकत नाही पण भाजप पुन्हा फुटणार हे नक्की कारण आता भाजपसोबत राहणे नको अशी भूमिका या नगरसेवकांची झालेली आहे . महापालिकेला राज्य सरकारकडून आर्थिक दिलासा मिळावा म्हणून मी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बोलणार आहे बाकी राज्याची आर्थिक परीस्थिती पाहता कसा मार्ग निघेल यावर आताच काही ठामपणाने बोलता येणार नाही, असेही ते म्हणाले .





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !