भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक : दाम्पत्याचा मृत्यू


संग्रामपूर : भरधाव चारचाकी दुचाकीवर आदळून झालेल्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या लाडणापुर फाट्याजवळ हा अपघात झाला. टूनकीकडून निघालेली चारचाकी (एम एच.15 ई.जी.1961) समोरून येत असलेल्या दुचाकी (एम.एच.30 पी 5649) वर आदळल्याने दुचाकीवर पती-पत्नी ठार झाले तर चारचाकी वाहन चालक जखमी झाला. मयतांमध्ये तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील गोविंदा किसन तायडे (60) व त्यांची पत्नी प्रमिला तायडे या दोघांचा समावेश आहे. चार चाकी वाहन चालकाला पोलिसांनी जखमी अवस्थेत सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !