एमपीएससीच्या सर्व रीक्तजागा 31 जुलैपर्यंत भरणार : अजित पवारांची घोषणा


मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशना ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत एमपीएससीवरुन प्रश्न उपस्थित करीत सरकारला कोडींत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली. फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !