माजी मंत्री खडसे म्हणाले ; ही कारवाई तर राजकीय हेतूने प्रेरीत


मुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर गुरुवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहे. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांसमोर येत त्यांनी राजकीय हेतूने प्रेरीत कारवाई असल्याचा आरोप केला. आपण ईडीला सहकार्य करणार असून त्यांना हवी असलेली माहिती मी देणार आहे परंतु मला यात राजकीय वास येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा भूखंड खाजगी आहे. कुछ तो होने वाला है, असे मेसेज जळगावात व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर फिरत आहेत. मला अडकविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझी चौकशी सुरु झाली. हे कार्यकर्त्यांनाही माहिती आहे यामुळे यात राजकीय हेतू असल्याचा दावा खडसे यांनी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !