जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले ; माजी मंत्री खडसे तर निर्दोष


मुंबई : भाजपाने कुभांड रचून केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील म्हणाले की, खडसे यांच्या संदर्भात कोणतेही तथ्य आढळलेले नाही किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिलं गेलं नाही. ओबीसी नेतृत्व असल्यानं त्यांना बाजूला करण्यात आलं. आता त्यांना राष्ट्रवादीत सन्मानानं प्रवेश दिल्यानं चिडून जाऊन भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. खडसेंना चुकीच्या पद्धतीनं अडकवत आहे मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !