गायरान भागात मेंढपाळांना चराईसाठी परवानगी मिळावी : प्रशासनाला निवेदन
रावेर : तालुक्यातील मुंजलवाडी, चुनाबर्डी येथील मेढपाळ यांना सरकारी गायरानात चराई व पिण्याच्या पाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी धनगर बांधवांतर्फे तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली.
पाणी व मेंढ्या चराईसाठी परवानगीची मागणी
निवेदनाचा आशय असा की, धनगर-मेंढपाळ बांधव 1947 पासून चुनाबर्डी (ता.रावेर) या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांचा व्यवसाय हा मेंढीपालनाचा आहे. महाराष्ट्र शासन व महसुल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक एमएफपी -2103 / प्र.क्र .135 / फ -1 मंत्रालय, मुंबई 02 जानेवारी 2017 या शासन निर्णया नुसार राज्यात वनक्षेत्रात मेंढी चराईसाठी प्रायोगीक तत्वावर जळगाव व बुलढाणा जिल्ह्यांना परवानगी दिलेली होती. पाणी न मिळाल्यामुळे व चराई क्षेत्रात मेंढ्या चारु न दिल्याने आमच्या 10 ते 20 मेंढ्या दगावल्या होत्या. सरकारी वनक्षेत्रात मेंढ्या चराई तसेच पिण्याची पाण्यासाठी लालमाती धरण व पानथा धरण येथे मेंढ्यांना पाणी मिळण्याकामी परवानगी मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.



