वरणगावातील समांतर महार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकारात्मक


वरणगाव : वरणगाव शहराबाहेरून बायपास गेल्याने शहरातील नागरीरकांचे व व्यापारी वर्गाच्या अस्तिवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेता वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी 14 व 15 जुलै रोजी राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्रजी फडके यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली व निवेदन दिले होते. मी नागपुरात असतांना संपूर्ण प्रस्ताव घेऊन या, तिथे सर्व अधिकारी असतील, तिथे निर्णय घेउ, असे आश्‍वासन गडकरी यांनी दिले होते. या अनुषंगाने नुकतीच पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट डॉ.राजेंद्रजी फडके यांच्या माध्यमातून घेण्यात आली. यावेळी समांतर महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक दर्शवली आहे.

माजी नगराध्यक्षांनी सादर केला प्रस्ताव
माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनील माळी, किरण धुंदे यांनी गडकरी यांची भेट घेत विस्तृत प्रस्ताव दिला. या प्रस्तावात फुलगाव फाटा, बसस्थानक चौक ते साईबाबा मंदिरापर्यंत समांतर महामार्ग बनविणे व त्यात दुभाजक टाकून लाईट (एलईडी) लावणे, बस्थानक चौक येथे भव्य सर्कल नागरीकांना बसण्यासाठी बनवणे व बस स्टाफ प्रवासी शेड तसेच शिवाजी नगर, बसस्थानक, सदानंद टॉकीज व सातमोर्‍यावरील पूल नवीन बांधणे तसेच तीर्थक्षेत्र नागेश्वर ते वरणगाव ऑर्डन्स फॅक्टरी दरम्यान रस्ता बनविणे या मागण्या सविस्तर प्रस्तावात केंद्रीय मंत्र्यांकडे सादर करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री नितीनगडकरी यांनी संपूर्ण बाजू शांततेत ऐकून घेतली व समांतर महामार्गाच्या कामाबाबत सकारत्मकता दर्शवली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !