श्री संत मुक्ताई पालखी सोहळा परतीनंतर भाविकांकडून स्वागत


मुक्ताईनगर : 312 वर्षाची अखंड परंपरा जोपासत रविवारी सकाळी 11.30 वाजता पंढरपूर येथून मुक्ताई पादुका पालखी सोहळा मुक्ताईनगरात शिवशाही बसने दाखल झाला. यावेळी पावसाच्या आगमनासोबत पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर श्री संत मुक्ताईचा भाविकांनी जयघोष करीत स्वागत केले. प्रवेशद्वारावर हभप विनायकराव हरणे यांनी मुक्ताई पादुका हातात घेतल्या व भाविक जयघोष करीत मुक्ताई मंदिरात दाखल झाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, उद्धव जुनारे महाराज, डॉ.जगदीश पाटील, विनोद सोनवणे, नरेंद्र नारखेडे यांच्यासह वारकरी, टाळकरी, भाविक उपस्थित होते.
जिल्हा बॅक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे व आमदार पाटील यांच्या पत्नी यामिनी पाटील यांनी मुक्ताई पादुकांचे दर्शन घेतले. मंदिराच्या मंडपात पालखी सोहळ्यात सहभागी महसुल, आरोग्य, बस कर्मचारी यांचा संस्थानतर्फे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सत्कार केला. मधुकर कडु (रा.पारोळा) यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
11 ऑगस्ट रोजी मुक्ताई पादुका पालखी सोहळा नवीन मंदीर ते जुने कोथळी मुक्ताई मंदीरात जाणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !