अहमदाबाद शहरात सिलिंडर स्फोट : सात जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली मात्र उपचारादरम्यान जखमींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. महिला आणि लहान मुलांचा देखील या भीषण स्फोटात मृत्यू झाला. 20 जुलै रोजी रात्री ही दुर्घटना घडली.

एलपीची गॅस गळतीने स्फोट
काही कामगार कारखान्यात काम करीत होते व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य हे एका खोलीत झोपले होते तेव्हा एलपीजीची गळती सुरू झाली. याचा अंदाज येताच जेव्हा त्यांच्या शेजार्‍यांनी दार वाजवून सतर्क केले तेव्हा कामगारांनी दिवा लावला. त्यातून स्फोट होऊन आणखी मोठी दुर्घटना घडली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !