प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराची हत्या


पाटणा : प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराची हत्या करण्यात आल्याची घटना बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये घडली. रामपूर गावातील रहिवासी असलेल्या 22 वर्षांच्या सौरभ कुमार शेजारच्या सोनरबरसा गावात प्रेयसीला भेटण्यासाठी गेला असता प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्याची हत्या केली. या घटनेनंतर सौरभच्या संतप्त कुटुंबीयांनी त्याच्या पार्थिवावर प्रेयसीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले. मृतदेहाचे दहन करण्यात आल्यानंतर पोलिसांना दोन्हीकडच्या लोकांना ताब्यात घेतले आहे.

मारहाणीनंतर कुटुंब पसार
23 जुलै रोजी सौरभ हा प्रेयसीला भेटण्यासाठी शेजारील गाव असलेल्या सोनरबरसा येथे गेला होता. त्यावेळी या दोघांनाही बोलताना मुलीच्या कुटुंबीयांनी पाहिले. त्यानंतर सौरभला मारहाण करण्यात आली. तसेच या मारहाणीत सौरभ गंभीररीत्या जखमी झाला. त्या परिस्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सौरभचा मृत्यू झालातर त्याला मारहाण करणारे प्रेयसीचे कुटुंबीय फरार झाले. या घटनेनंतर मृतदेहावर प्रियसीच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !