शक्तीप्रदर्शन करीत नामदार हरीभाऊ जावळेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज
विधानसभा निवडणूक : माजी मंत्री खडसेंसह शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटलांनीही लावली हजेरी
रावेर : रावेर विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार तथा केळी संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष व आमदार असलेल्या हरीभाऊ जावळे यांनी माजी मंत्र्यांसह खासदार, आमदार तसेच हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थिती शक्ती प्रदर्शन करीत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी शहरातील मानाचे ग्रामदैवत पाराचा गणपती मंदिरावर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, बेटी बचाव बेटी पढाव राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके व उमेदवार आमदार जावळे यांनी विधीवत पूजन आरती करून ढोल-ताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांची ही उपस्थिती होती. प्रचंड घोषणा व शक्तीप्रदर्शन करत मिरवणूक तहसील कार्यालयात आल्यानंतर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.
यांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज
प्रसंगी जि.प.चे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन, रीपाइ जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन आदींच्या उपस्थिती आमदार हरीभाऊ जावळे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले.


आमदार जावळेंचे शक्ती प्रदर्शन
आमदार जावळे यांनी मानाचे ग्रामदैवत पाराचा गणपती मंदिरावर आरती केल्यानंतर उघड्या वाहनातून मतदारांना अभिवादन करीत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी आमदारांसोबत वाहनावर खासदार रक्षा खडसे यांनीही मतदारांना अभिवादन केले. या मिरवणुकीत भाजप जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ नेते सुरेश धनके, हिरालाल चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, संचालक नरेंद्र नारखेडे, व्हा.चेअरमन भागवत पाटील, हरीश गणवानी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, जळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ.मिलिंद वायकोळे, रावेर भाजप तालुकाध्यक्ष सुनील पाटील, तालुकाध्यक्ष योगीराज पाटील, युवा सेना शहर युवाधिकारी राकेश घोरपडे, सुरेखा कोळी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील, तालुकाध्यक्ष रवी सोनवणे, रीपाइं जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, तालुकाध्यक्ष गणेश पवार, तालुकाध्यक्ष अरुण गजरे, रासप जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परीषद सदस्य नंदा पाटील, रंजना पाटील, पंचायत समिती सदस्य जितु पाटील, पी.के.महाजन, संदिप सावळे तसेच शिवसेना महायुतीचे सर्व जिल्हा परीषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व आघाडी अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पेज प्रमुख, शक्ती केंद्र, बुथ प्रमुख, कार्यकर्ते आणि महायुतीचे सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी व मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

