देखभालीचा खर्च पाणीपट्टीपेक्षा अधिक : डॉ.प्रदीप पुरंदरे


भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात डॉ.सुधा मोकाशी उपक्रमांतर्गत ऑनलाईन व्याख्यान

भुसावळ : देखभालीचा खर्च पाणी पट्टीपेक्षा अधिक असून पाणीपट्टी मात्र त्याप्रमाणात आकारली जात नाही. पाणीपट्टीच्या वसुलीपेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक आहे.पाणी सर्वांना हवे आहे मात्र पाणीपट्टी कुणी भरायला तयार नाही, अशी अवस्था राज्यात असल्याचे जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबादचे डॉ.प्रदीप पुरंदरे येथे म्हणाले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग, नियोजन अभ्यास मंडळ आणि मराठी अर्थशास्त्र परीषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.सुधा मोकाशी उपक्रमांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

सिंचन घोटाळ्यांवर टाकला प्रकाश
‘महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाचा आढावा’ या विषयावर डॉ.प्रदीप पुरंदरे यांनी सखोल मार्गदर्शन केले. यात त्यांनी महाराष्ट्राातील पाण्याचे स्थान, राज्यात येवू घातलेली संकटे, जल विकासाचा आढावा, सिंचन प्रकल्पांची दशा, कालोघात झालेले बदल, प्रकल्पांची देखभाल, दुरूस्ती पाणीपट्टी, सिंचन घोटाळा आदींबाबत सखोल माहिती दिली व काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. जलविकासाचे विविध पर्याय, जल विकासाचे महत्त्व, पाणलोट क्षेत्र विकास, लघूपाट बंधारे, शेततळे, पाणी उपलब्धता, सिंचनक्षमता, सिंचन प्रकल्प, पाणी वापर आदींबाबत सखोल माहिती त्यांनी दिली.




यांची व्यासपीठावर उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी अर्थशास्त्र परीषदेचे अध्यक्ष डॉ.अनिल सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष डॉ.के.के. पाटील, कार्यवाह खजिनदार डॉ.मारोती तेगमपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, डॉ.बी.एच.ब-हाटे, डॉ.ए.डी.गोस्वामी, डॉ.एन.ई.भंगाळे उपस्थित होते. प्रा.डॉ.ए.डी. गोस्वामी व प्राचार्य डॉ.के.के.पाटील व डॉ. मारोती तेगमपुरे यांनी प्रास्ताविक केले

उपक्रमाचे उगमस्थान महाविद्यालयच
डॉ.अनिल सूर्यवंशी म्हणाले की, मराठी अर्थशास्त्र परीषदेला 46 वर्षांची वैचारीक परंपरा लाभलेली आहे. यजमान महाविद्यालय आणि मराठी अर्थशास्त्र परीषदेचा अतिशय जवळचा संबंध असून 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंहेबर 2012 मध्ये परीषदेचे 3 6वे राष्ट्रीय अधिवेशन महाविद्यालयाने यशस्वीरित्या पार पाडले होते. डॉ.सुधा मोकाशी उपक्रमाचे उगमस्थान यजमान महाविद्यालयच असल्याची आठवण त्यांनी करून दिली. सूत्रसंचालन डॉ.किरण वारके तर वक्त्यांचा परीचय प्रा.व्ही.ए.सोळुंके यांनी तर आभार प्रा.एस.टी.धूम यांनी मानले. यशस्वीतेसाठी नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.एस.टी.धूम, डॉ.किरण वारके, प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.जितेंद्र आडोकार, प्रा.उज्ज्वला महाजन यांनी परीश्रम घेतले. तांत्रिक सहकार्य संगणक विभागातील प्रा.हर्षल पाटील व दीपक वाणी यांनी केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !