यावल शहरात नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
यावल : बेताल वक्तव्य करणार्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेचे शहरातील यावल टी पॉईंटवर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता दहन करीत राणेंच्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी यावेळी निषेध केला. यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक दीपक बेहेडे, शिवसेना तालुकाप्रमुख रवी सोनवणे, शिवसेना उपतालुका प्रमुख शरद कोळी, शिवसेना उपतालुका प्रमुख आर.के चौधरी, शिवसेना तालुका संघटक पप्पू जोशी, शिवसेना माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, शिवसेना आदिवासी तालुका प्रमुख हुसेन तडवी, शिवसेना तालुका प्रसिद्धीप्रमुख संतोष वाघ, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष धोबी, शिवसेना उपशहर प्रमुख किरण बारी, शिवसेना उपशहर जितेंद्र फालक, शिवसेना शहर संघटक सुनील बारी, युवा सेना उपशहर अधिकारी पिंटु कुंभार, युवा सेना शहर सरचिटणीस विजय पंडित, शिवसेना उपशहर संघटक नाना पाटील, विभाग प्रमुख योगेश राजपूत, विभाग प्रमुख प्रल्हाद बारी, शिवसेना उपविभाग संघटक पराग महाजन, पिंप्री सरपंच मोहन कोळी, विभागप्रमुख गजानन कोळी, भरत चौधरी, शिवसेना उपविभाग प्रमुख सारंग बेहेडे, योगेश पाटील, मनवेल शाखाप्रमुख विनायक कोळी, गोकुळ कोळी, शेख याकुब राजु, मयुर खर्चे यांच्या सह शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





