बॅटरी चोरीप्रकरणी अंजाळेतील तरुणाला अटक


यावल : तालुक्यातील नायगाव येथून रविवारी मध्यरात्री ट्रॅक्टरच्या 10 हजार रूपये किमतीच्या दोन बॅटरी अज्ञात चोरट्याने लांबवल्या होत्या. या प्रकरणी यावल पोलिसांनी अंजाळे येथील एका संशयीताला अटक केली. त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नायगाव येथील सुनील भिका शिरसाठ यांच्या फिर्यादीनुसार रविवारी रात्री त्यांच्या घराबाहेर लावलेल्या ट्रॅक्टरच्या (क्रमांक एम.एच.48.टी.1083) दोन बॅटर्‍या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या. यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ यांनी संशयीत मुकुंदा पंढरीनाथ सपकाळे (25, रा.अंजाळे) यास ताब्यात घेतले असता त्याने बॅटरी चोरीची कबुली दिली. यानंतर त्यास प्रथमवर्ग न्यायाधीश एम.एस. बनचरे यांच्या समोर हजर केले असता चार दिवसांची 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !