भुसावळात शनिवारी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी


भुसावळ : टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 17 वी 16 वर्षाच्या आतील मुला/मुलांची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नागपूर येथे 4 ते 6 सप्टेंबर 2021 दरम्यान होत आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड शनिवार, 28 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता हरातील पु.ओ.नाहाटा कॉलेजच्या मैदानावर होत आहे. 1 जानेवारी 2005 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे व अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा महासंघटनाचे अध्यक्ष प्रा.आ. चंद्रकांत सोनवणे, डॉ.प्रदीप तळवलकर, प्रा.आनंद उपाध्याय, निना कटलर, गोपाल जोनवाल, रमण भोळे, प्रदीप साखरे, बी.एन.पाटील, राजू कुलकर्णी, मधुकर वाणी, अजय डोळे, खुशाल देशमुख, प्रा.आसीफ खान, गोपाल जोनवाल, मेघशाम शिंदे, राहुल कोळी, प्रतीक कुलकर्णी, तारीख अहमद यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !