कनिष्ठ महाविद्यालयाचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून करण्यासाठी शासनाला भाग पाडणार


आमदार कपिल पाटील यांचे शिष्टमंडळाला आश्‍वासन

भुसावळ : मुंबई विभागाचे शिक्षक आमदार कपिल पाटील विधीमंडळ सदस्य समितीच्या दौर्‍याच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात आले असताना खिरोदा येथे जात असताना भुसावळात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील सोनार, सचिव प्रा.शैलेश राणे, उपाध्यक्ष प्रा.एस.एच.चौधरी यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख समस्यांबाबत त्यांना निवेदन दिले. कनिष्ठ महाविद्यालयाचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून करण्यासाठी शासनाला भाग पाडणार असल्याची ग्वाही आमदार कपिल पाटील यांनी यावेळी दिली.

विविध मागण्यांबाबत निवेदन
शिष्टमंडळाने स्वतंत्र प्रशासन, 2012-2013 नंतरची पायाभूत पदे, अघोषित कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकड्या अनुदानावर आणण्याच्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून व्हावे, शालार्थ त्रृटी, 2005 नंतर जुनी पेन्शन योजना लागू करणे, तासिका तत्त्वावर व अर्धवेळ काम करत असलेल्या कर्मचार्‍यांना सेवेत संरक्षण मिळणे संदर्भात निवेदन विधान परीषद सदस्य आमदार कपिल पाटील यांना दिले. संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड यांनी जळगाव येथेच आमदार कपिल पाटील यांना या समस्यांबाबत अवगत केले होते. सर्व सर्व समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही आमदार कपिल पाटील यांनी यावेळी दिली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !