भुसावळातील टिंबर मार्केटला जोडणार्‍या रस्त्याखाली ड्रेनेजची मागणी


खासदार रक्षा खडसेंसह आमदार सावकारे व शिष्टमंडळाची डीआरएम प्रशासनाशी चर्चा

भुसावळ : भुसावळ बसस्थानक रस्त्याचे कामे करावे तसेच आराधना कॉलनी टिंबर मार्केटला जोडणार्‍या बोगद्यालगत ड्रेनेजचे काम करावे यासह अन्य मागण्यांबाबत खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे व शिष्टमंडळाने गुरूवारी नूतन डीआरएम एस.एस.केडीया यांच्याकडे केली.

यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
गुरूवारी खासदार रक्षा खडसे, रेल्वे प्रवासी सुविधा समिती सदस्य डॉ. राजेंद्र फडके, युवराज लेाणारी, सुनील काळे, परीक्षीत बर्‍हाटेे यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन विकास कामांबाबत चर्चा केली.
गुरूवारी दुपारी चार वाजता खासदार खडसे, आमदार सावकारे, डॅा. फडके, शहराध्यक्ष परिक्षित बर्‍हाटे, सुनील काळे, युवराज लेाणारी, संदीप सुरवाडे, रमा शंकर दुबे, एडीआर मनोज सिन्हा, डीसीएम अरुणकुमार आदींनी चर्चेत सहभाग घेतला.




आराधना कॉलनीत ड्रेनेजची मागणी
शहरासाठी महत्वपूर्ण असलेला आराधना कॉलनी- टिंबर मार्केटला जेाडणारा बोगदा तयार झाला आहे,मात्र पाण्याचे ड्रेनेज काढलेले नाही, त्यामुळे पुलाखाली जणू तलाव साचत आहे, रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अंधार राहात असतो, त्यामुळे पाऊस नसतांना नागरीकांना अंधारातून येणे-जाणे करावे लागते, त्यासाठी बोगद्यात लाईटाची व्यवस्था करावी, तसेच लेाखंडी पूलाजवळ बांधण्यात आलेली संरक्षण भिंत अपूर्ण असल्याने तेथून अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांचा वापर सुरू असल्याने तेथेे भिंत तत्काळ पूर्ण करावी, रेल्वे स्थानकावर येण्या जाण्याचे दोन्ही मार्ग सुरू करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी यावर आमदार संजय सावकारे यांनी चर्चा केली. वरणगाव येथील सिध्देश्वर नगरसजवळ आरयुबी तयार करण्यावर डीआरएम यांच्याशी उपस्थितांची चर्चा झाली.

रेल्वेच्या ‘त्या’ जागेवर वर्कशॉप
वरणगाव येथील पादचारी पूलाचे अर्धवट काम झाले असून ते काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तसेच रेल्वेने अतिक्रमण काढले मात्र त्या जागेवर एकही प्रकल्प नसल्याचे छेडले असता त्या जागेवर मेमू गाडीचे वर्कशॅाप सुरू केले जात आहे. त्याची निवीदा प्रक्रीया झाली आहे, प्रत्यक्ष कामास लवकरच सुरूवात केली जाईल, असे डीआरएम केडीया म्हणाले. पाचेारा-जामनेर मार्गाविषयी सर्व्हेक्षण सुरू असल्याचे डीआरएम म्हणाले. स्टेशन रस्त्याची दुरवस्थाच झाल्याने पालिका व रेल्वे प्रशासनाने निधी खर्च करून कामे करावे, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !