तरुणांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी
रावेर : तालुक्यातील ताडजिन्सी गावानजीक दोन तरुणांच्या अपघातात झालेल्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याची मागणी मृत मुलांच्या वडिलांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे दिलेल्या एका अर्जाद्वारे केली आहे. रविवार, 8 ऑगस्ट रोजी ताडजिन्सी गावानजीक झालेल्या अपघातात जगदीश मंदलाल चौधरी व अंकित ज्ञानेश्वर महाजन यांचा मृत्यू झाला होता. याबाबत मयताच्या वडिलांनी तक्रारी अर्ज दिला होता. याबाबत कोणतीही कारवाई संबधितावर झाली नसल्याने या घटनेचा तपास होऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मयताचे ज्ञानेश्वर महाजन व मंदलाल चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





