भुसावळात उद्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची बैठक
भुसावळ : भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर व भुसावळ ग्रामीणची संघटनात्मक बाबींवर व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी रविवार, 29 रोजी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक होत आहे. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे असतील. जळगाव जिल्हा ग्रामीण भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल मार्गदर्शन करतील. बैठकीस भाजपा भुसावळ शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, भुसावळ ग्रामीण अध्यक्ष भालचंद्र पाटील, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजूजी खरारे, धनराज बाविस्कर, अनंत नन्नवरे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस नागेश्वर साळवे, सुबोध वाघमारे, प्रशांत निकम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा.विलास भालेराव उपस्थित राहणार आहेत. बैठकीस उपस्थितीचे आवाहन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे व भाजपा भुसावळ ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष दिलीप सुरवाडे यांनी केले आहे.





