महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विजय अंभोरेंचे भुसावळात स्वागत
भुसावळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर त्यांचे भुसावळात आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नूतन उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, बुलढाणा एस.टी.इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, चिखलीचे माजी नगराध्यक्ष दादूसेठ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु जाती विभागाचे समनव्यक भगवान मेढे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष इस्माईल गवळी, भुसावळ काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष प्रकाश मोरे, सुरेश टाक, विनोद पवार, महेंद्र महाले, नंदा बावटे, संजय नरवाडे, निलेश थोरात आदी उपस्थित होते.





