बाल संस्कार मंडळ एज्यु.सोसायटी अध्यक्षपदी महेश वाणी
यावल : बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या कार्यालयात झाली. सन 2021 ते सन 2024 साठी नवीन कार्यकारीरणीची निवड करण्यात आली. समितीचे अध्यक्षपद हे पुन्हा महेश वासुदेव वाणी यांना देण्यात आले आहे तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.सतीश सुपडू यावलकर, सचिव श्रीहरी मोरेश्वर कवडीवाले, सहसचिव संतोष श्रीहरी कवडीवाले, कोषाध्यक्ष ईश्वरलाल राजाराम वाणी तर सदस्य डॉ.जीवन वासुदेव यावलकर आणी तेजस सतीश यावलकर यांची निवड करण्यात आली. या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पद्माकर रतन पाटील (जळगाव) यांनी काम पाहिले तर विधीज्ञ म्हणून अॅड.चंद्रकांत लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.





