क्रिकेट निवड चाचणीत खेळाडूनीं गाळला घाम
भुसावळ : शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात झालेल्या सब- ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणीस जिल्हाभरातील खेळाडूंनी उत्साहपूर्वक हजेरी लावली तसेच घाम गाळत निवड चाचणीला प्रतिसाद दिला. निवड चाचणीची सुरुवात प्रा.आनंद उपाध्याय यांच्या हस्ते चेंडू टोलवून करण्यात आले. यावेळी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, क्रिकेट कोच राहुल कोळी, टेनिस बॉल क्रिकेट राष्ट्रीय खेळाडू प्रतीक कुलकर्णी, विकास पाटील यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. निवडण्यात आलेले खेळाडू 3 ते 6 सप्टेंबर दरम्यान नागपूर येथे होणार्या 17 व्या सबज्युनियर राज्य अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करतील. शासनाने नुकतेच टेनिस बॉल क्रिकेटला स्पोर्ट्स कोट्यात समाविष्ट केल्याने भविष्यात खेळाडूंना शासकीय सेवेत या खेळाचा लाभ मिळणार आहे.





