माजी मंत्री एकनाथराव खडसेसह अॅड.रोहिणी खडसेंचा सत्कार
हरताळे प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी मानले आभार
मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांच्या मागणीनुसार ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याचा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मार्गी लावल्यानंतर जिल्ह्यात परतलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसेसह जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांचा हरताळा ग्रामस्थांनी सत्कार केला.
अॅड.रोहिणी खडसेंचा पाठपुरावा ठरला मोलाचा
शुक्रवार, 20 ऑगस्ट रोजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तळवेल उपसा सिंचन योजनेचे काम जवळपास पूर्ण झाल्याने हतनुरचे पाणी ओझरखेडा धरणात टाकण्याबाबत चर्चा करण्यात आली होहती मात्र दोन वर्षांपासून ही योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बद असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता वाय.एम.कडलग यांना तत्काळ आठ दिवसात सर्व तांत्रिक बाबी दुर करून योजना कार्यान्वित करून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तळवेल उपसा सिंचन योजनेची तांत्रिक अडचण दूर करण्यात आली. शुक्रवार, 27 ऑगस्ट रोजी ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली. अन्य तांत्रिक बिघाड दोन दिवसात दूर करून येत्या 2 सप्टेंबर रोजी माजी पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसा रोजी जलपूजन करण्यात येऊन ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात येणार आहे.



हरताळा ग्रामस्थांनी मानले आभार
माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या प्रयत्नाने ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याचा विषय मार्गी लागल्याने हरताळा ग्रामस्थांनी व लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे खेवलकर यांचे आभार मानले व त्यांचा सहृदय सत्कारही केला.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे यांच्यासह हरताळा सरपंच दीपक कोळी, बाळू भागवत पाटील, अशोक हरी चौधरी, उपसरपंच नामदेव भड, माजी सरपंच समाधान कार्ले, के.एन.पाटील, किसन चव्हाण, गोपाळ उदळकर, राजेंद्र खराटे, पांडुरंग शेळके, दिलीप तायडे, शंकर चिखलकर, रहेमान शेठ, नामदेव घोपे, पांडुरंग शेळके, दिलीप तायडे, राजू खराटे, कल्पेश चौधरी, उमेश पाटील, महेश शेळके, वसीम शब्बीर सय्यद, अब्दुल्ला मुल्लाजी, शे.जहुर शे. शकुर, दिलीप दांडगे, नामदेव दांडगे, निलेश कार्ले, सुभाष ठाकूर, मोहसीन खान शब्बीर खान उपस्थित होते. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे नॅशनल हायवेच्या कामात नुकसान झाल्याने त्याची नुकसान भरपाई तत्काळ जलसंपदा विभागाला देण्यात यावी, अशी मागणी नईचे प्रकल्प संचालक सिन्हा यांच्याशी चर्चा केली. त्यावर सिन्हा यांनी लवकरच जलसंपदा विभागाला निधी हस्तांतरित करण्यात येईल, असे सांगितले.

