भुसावळातील स्वस्त धान्य दुकानदाराकडून आर्थिक लूट : नगरसेवक पिंटू ठाकूर


भुसावळ : शहरातील स्वस्त धान्य क्रमांक दुकान 42 व 43 चे चालक नारायण वाणी यांनी प्रभागातील नागरीकांकडून अन्न सुरक्षा योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी दोन हजारांची मागणी करीत लूट चालवली असल्याची तक्रार नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे. नगरसेवक ठाकूर यांच्या तक्रार अर्जानुसार दुकान चालक वाणी यांनी भुसावळ तहसील कार्यालयातील अधिकारी व पुरवठा अधिकार्‍यांचे नाव सांगून अन्न व सुरक्षा योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी लाभार्थीकडून दोन हजार रुपये उकळले असून अद्यापही बेकायदा वसुली सुरू आहे. या प्रकाराला पायबंद लावण्यासह स्वस्त धान्य दुकान क्रमांक 42 व 43 ची चौकशी करावी तसेच नव्याने सर्वे करून वंचित रेशन कार्ड धारकांचे अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !