परीवहन मंत्री अनिल परबांना ईडीची नोटीस


मुंबई : राज्याचे परीवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणात अटक केल्यानंतर आकसाने अनिल परब यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे आपल्या ट्विटमधून राऊत यांनी सूचित केले आहे. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

31 ऑगस्टला हजर राहण्याचे ईडीचे आदेश
परीवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने 100 कोटीच्या कथित वसुलीसंदर्भात ही नोटीस बजावली आहे. ईडीने अनिल परब यांना मंगळवारी, 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात हजार राहण्याची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे ही माहिती देत सूचक विधान केले आहे. मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडल्यानंतर राऊत यांनी ‘शाब्बास’ अशी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परिवहन मंत्री अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत, असे सांगत कृपया लहीेपेश्रेसू समजून घ्या असे सांगत रत्नागिरीत नारायण राणे यांना अटक केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. मात्र, कायदेशीर लढाई कायदयानेच लढू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !