सावद्यातील सोमवारगिरी मढीस तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवा


नगरसेवक राजेश वानखेडे यांची मागणी, पालकमंत्र्यांकडून आश्वासन

सावदा : शहरातील पुरातन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र असलेल्या येथील सोमवारगिरी मढीस तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा तसेच येथे विविध विकासकामांसाठी 50 लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी शहराचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. पालकमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.

सोमवारगिरी मढी भाविकांचे श्रद्धास्थान
बखतपुरी गोसावी समाधी ट्रस्ट, सोमवारगिरी मढी पुरातन मंदिरात दरवर्षी जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सोबत यात्रा महोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम होतात. या जागृत देवस्थानावर श्रद्धा असलेले लोक पंचक्रोशीत नव्हे तर लांबवरून दर्शनासाठी येतात मात्र येथे असलेल्या सोयी-सुविधा तोडक्या असल्याने नव्याने येथे तीर्थक्षेत्र विकासांतर्गत सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. विकासकामांसाठी पन्नास लाख रूपयांचा निधी मिळावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. प्रसंगी नगरसेवक राजेश वानखेडे यांच्यासह नगरसेवक किशोर बेंडाळे, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, अतुल नेमाडे, महेश भारंबे, कुशल जावळे, किरण पाटील, हरीसिंग परदेशी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. पालकमंत्री यांनीदेखील या कामाला लवकरच मंजुरी मिळेल, असे आश्‍वासन दिले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !