रोटरीतर्फे शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याबाबत कार्यशाळा
भुसावळ : आकार प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब भुसावळ आणि इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लॉसम यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती मूर्ती तयार करण्याबाबत रविवारी कार्यशाळा घेण्यात आली. शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याबाबत 14 वर्ष व त्यापील वयोसाठीासाठी ही कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत 65 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. याप्रसंगी क्लबतर्फे सर्व विद्यार्थ्यांना दोन किलो शाडू माती व ब्रश पुरवण्यात आला तसेच गणपती मूर्ती कशी बनवावी? याबाबत प्रशिक्षण भुसावळातील प्रतिष्ठीत मूर्तिकार तथा रंगमंच कार रमाकांत भालेराव यांनी दिले. मूर्तीची घरीच स्थापना करून घरीच विसर्जन करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लॉसम यांनी फळ व भाज्यांचे बी व बियाणे देऊन त्यांना वृक्ष रोपणाबाबत माहिती देण्यात आली. मूर्तिकार रमाकांत भालेराव यांचे स्वागत व सत्कार राजेंद्र कुमार फेगडे यांनी केले.इतर पाहुण्यांचे स्वागत इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लॉसमचे अध्यक्ष तृप्ती नागोरी यांनी केले.
यांचे उपक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम
प्रकल्पाच्या उद्घाटन रोटरीचे माजी अध्यक्ष व सीनियर सिटीजन गजानन ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उपक्रम यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळच्या माजी अध्यक्ष शीतल भराडीया यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आला. याप्रसंगी इनरव्हील क्लब सदस्य रीतीका हेडा, रुचिता अग्रवाल, पल्लवी झोपे, राखी भराडिया, श्वेता लड्डा, इशा मनवानी, अमृता बजाज, शीतल आरोरा, गीतिका दर्गड, रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे राजेश ए.अग्रवाल, महेश भराडीया, गजानन ठाकूर, मदन बोरकर, राजेंद्र पाटील उपस्थित होते. मनोज बोला इतरांनी परीश्रम घेतले.




