पंचायत समितीच्या शेष फंडात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी निर्दशने
आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वात पंचायत समितीत झाले निर्दशने
रावेर : रावेर पंचायत समितीच्या शेष फंडात झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करावी तसेच 20 टक्के व 10 टक्के वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या चौकशीसाठी निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वात पंचायत समितीबाहेर सोमवारी निर्दशने करण्यात आले.
गटविकास अधिकार्यांना निवेदन
निळे निशान सामाजिक संघटनेेने दिलेल्या निवेदनानुसार तीन लाखांच्या वरील साहित्य खरेदी करतांना ई निविदा का करण्यात आली नाही, वैयक्तिक शौचालय अनियमता झाली आहे का? तीन लाखांच्यावर दरपत्रके घेऊन साहित्य वाटप झाले आहे का ? असा प्रश्न उपस्थित करीत शेष फंडात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे निर्दशने करून निवेदन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना देण्यात आले आहे.



यांची होती उपस्थिती
निळे निशान सामाजिक संघटनेेने केलेल्या आंदोलना सत्ताधारी भाजपा विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच येत्या 10 सप्टेंबरपर्यंत चौकशी करून अहवाल द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गाढे, बाळू तायडे, बाळू निकम, सुधीर सैंगमिरे नारायण सवर्णे, छगन सवर्णे, विजय धनगर, महेश तायडे, सदाशीव निकम आदी निळे निशान सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


