बोदवड तालुक्यात भाजपातर्फे शिरसाळा मारोती मंदिराबाहेर शंखनाद आंदोलन
बोदवड : भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहराच्या वतीने सोमवारी तालुक्यातील जागृत देवस्थान शिरसाळा मारोती मंदिर येथे मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनप्रसंगी तालुका सरचिटणीस अमोल देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. बोदवड तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, तालुका उपाध्यक्ष भागवत चौधरी, विक्रमसिंग पाटील, भाजपा चित्रपट कामगार आघाडी तालुकाध्यक्ष उमेश गुरव, भाजपा बोदवड़ शहराध्यक्ष नरेश आहुजा, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप घुले, संजय अग्रवाल, सुनील माळी, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस उमेश पाटील, अभिषेक झाबक, भूषण देशमुख, राहुल माळी, जीवन माळी, भास्कर आव्हारे, मधुकर मूळतकर, मयूरेश शर्मा, सागर गंगतीरे, पंकज चांदुरकर व असंख्य भाविक भक्तगण महिला व पुरुष उपस्थित असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या तालुका मिडिया प्रमुख रोहित अग्रवाल यांनी कळवले आहे.




