किनगावात २२ वर्षीय अविवाहित तरुणाची आत्महत्या
यावल : तालुक्यातील किनगाव येथे एका २२ वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. मयत तरुणाचं नाव रवींद्र रमेश गायकवाड असे आहे. त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. किनगाव येथील उखा रामलाल जाधव यांनी दिलेल्या खबरी नुसार त्यांचा अविवाहित भाचा रवींद्र रमेश गायकवाड (२२) हा त्यांच्या घरी राहत होता. सोमवारी तो घरात एकटा होता दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो घरात काय करतोय हे पाहण्या करीता गेले असता तो घरातील छताच्या लोखंडी एंगल ला दोरी बांधुन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तेव्हा याबाबत तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व रविंद्र याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालय मध्ये आणण्यात आला या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. याबाबत यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.





