आडगावातील शेतमजूर तरुणाची आत्महत्या


यावल : तालुक्यातील आडगाव येथे एका शेतमजुरी करणाऱ्या तरूणाने आपल्या गळफास घेवुन आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना उघडकीस आली. आडगाव, ता.यावल येथील अजय उर्फ भिमा उत्तम इंधाटे (२२) या शेतमजुरी करणाऱ्या तरूणाने आई गावाला गेली असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताला दोरी बांधुन आत्महत्या केली. याबाबत धनराज गोंविंद बागुल (३०, रा कळमगाव, ता.चोपडा) यांनी पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख हे करीत आहेत. मयत अजय इंधाटे याच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिळके यांनी शवविच्छेदन केले . तरूणाच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होवू शकले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !