भुसावळात किराणा दुकान फोडले : 50 हजारांचा सामान लांबवला
भुसावळ : बंद किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 50 हजारांचा सामान लांबवल्याचा प्रकार मंगळवारी उघड झाला. खडका रोडवर पियुष सुभाष अग्रवाल यांचे सुहानी किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले व मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप तुटलेले आढळले. चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून दुकानातील 20 हजार रुपयांची रोकड, सिगारेट, बिस्कीट, तंबाखू, बिडी असा सुमारे 50 हजार रूपयांचा माल लांबवला. बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, विकास सातदिवे, योगेश माळी, शाह यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी भेट देत पाहणी केली. दरम्यान दुकानातून आठ हजार रुपयांची सिगारेट, पाच हजारांची बिडी, गायछाप तंबाखू, बिस्कीट पुडे, सुगम पुडी तसेच 11 हजार रूपयांची चिल्लर, नऊ हजार रूपयांच्या नोटा मिळून 20 हजार रोख व अन्य माल मिळून 50 हजाराचा मुद्देमाल लांबविला.





