भुसावळातील 20 वर्षीय तरुणाचा डेंग्यूने मृत्यू
भुसावळ : शहरातील साहिल सुनील बठेजा (20, हनुमान नगर, प्रभाग क्रमांक 20) या तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मृत साहिल हा एकुलता असल्याने सिंधी कॉलनी, हनुमान नगरसह शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाही प्रशासनाकडून केवळ कंटेनर सर्वेक्षणाव्यतिरिक्त अन्य ठोस उपाययोजना होत नसल्याचे नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
शहरातील हनुमान नगरातील गुरुकृपा टेंन्टच्या समोरील रहिवासी साहिल सुनील बठेजा (20) हा मुंबईत बीबीएचा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता मात्र कोरोनामुळे शिक्षण बंद असल्याने तो शहरात परतला. गत आठवड्यात त्याला ताप आल्यानंतर त्यास जळगावच्या सहयोग क्रीटीकल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र सोमवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या मृत साहिलवर सायंकाळी सिंधी समाज स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, साहिलच्या पश्चात आई, वडील, एक बहिण, काका, काकू असा परीवार आहे. तो घनश्याम वाईनचे संचालक सुनीलकुमार बढेजा यांचा मुलगा होय.




