यावल तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षकपदी मुकूल तोलावार


यावल : यावल तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक म्हणून मुकूल तोलावार यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. यावल भूमी अभिलेख कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून उपअधीक्षक नसल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांना आपल्या विविध कामानिमित्ताने वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. तत्कालीन उपअधीक्षक ए.आर.जगताप यांच्याकडे रावेर, मुक्ताईनगर व यावल असे तीन तालुक्योच पदभार असतानाही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. जगताप यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर रीक्त जागी वर्धा येथील मुकूल व्ही.तोटावार यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर सोमवार, 30 ऑगस्ट रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. यावल तालुक्यास 84 गावे जोडण्यात आली आहेत. प्रलंबित कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !