12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा ? मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. विधानपरीषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडल्याने या बैठकीत त्यावर चर्चा होवून तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र काही नावांवर आक्षेप असल्याने ही नावे वगळली जातील, असाही अंदाज व्यक्त होत आहे.

उच्च न्यायालयातही उपस्थित झाला मुद्दा
राज्यपालनियुक्त आमदारांचा हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात देखील गेला होता. सामाजिक कार्यकर्ते रतन सोली लत यांनी कोश्यारी यांच्या विधानपरीषद आमदार नियुक्त करण्यातील निष्क्रीयतेबाबत जनहीत याचिका दाखल केली होती. सुनावणीवेळी मुख्य न्यायाधीशांनी राज्यपालांच्या वकिलापुढे पुढील प्रश्न उपस्थित केले होते. संविधानानं दिलेल्या सर्वोच्च अधिकारांनुसार राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे त्यांना कोर्टही ते निर्देश देऊ शकत नाही. मात्र परीस्थिथती आणि जबाबदारीचं भान ठेवत राज्यपालांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यायला हवा, असं कोर्टाने त्यावेळी म्हटलं होतं.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !