यावलमध्ये दुकान फोडून साडेसहा हजारांची रोकड लांबवली


यावल : एरव्ही चोरी झाल्यानंतर चोरटे मागे कुठलाही पुरावा ठेवत नाहीत मात्र शहरात चोरी झाल्यानंतर चोरट्यांनी जाताना किती रक्कम लांबवली याचा हिशोबच ठेवल्याने सर्वत्र या चोरीची चर्चा होत आहे. यावल पोलीस सीसीटिव्ही फुटेजवरून या चोरट्याचा शोध घेत आहेत. शहरातील अंकलेश्वर बर्‍हाणपुर राज्यमार्गालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संकुलनातील श्रीहरी कृपा बुक डेपो अंड प्रोव्हिजन स्टोअर्स दुकान मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडले. लोखंडी रॉडच्या सहाय्याने दुकानाची कूलूपे, शटर,लोखंडी चॅनेलगेट तोडून चोरट्यांनी दुकानातील सामानाची शोधाशोध करीत गल्ल्यात असलेले रोख सहा हजार 400 रुपयांची रोकड घेऊन त्यांनी पोबारा केला. चोरीचा हा प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे चोरट्याने रक्कम मोजून एका कागदावर बेरीज केली व कागद दुकानात ठेवला हेदेखील विशेष!


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !