रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान


भुसावळ : शिक्षक दिनानिमित्त ‘सन्मान गुरूवर्यांचा’ कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लबच्या सभागृहात 5 सप्टेंबरला सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष डॉ.संजू भटकर असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पदवीधर आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार संजय सावकारे, उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, ग.स.सोसायटीचे माजी संचालक तुकाराम बोरोले असतील. याप्रसंगी सेक्रेटरी जीवन महाजन, ट्रेझरर सुनिल वानखेडे, प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे, प्रोजेक्ट समन्वयक प्रदीप सोनवणे उपस्थित राहतील. यावेळी भुसावळ, बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर, यावल, रावेर तालुक्यातील जिल्हा परीषद, खाजगी प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयातील 20 शिक्षकांना स्मतिीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.

यांचा होणार सन्मान : जिल्हा परीषद विभाग
नारायण विठ्ठल कुंभार (कोळन्हावी, यावल),विजय रामगिर गोसावी (कुसुंबे,रावेर),रविंद्र पांडुरंग चिंचपुरे (शेवगे पिंपरी, जामनेर), रामचंद्र शंकर काळे (वाकी,बोदवड), दीपाली बापू पाटील (साकरी, भुसावळ), ममता सिकंदर तडवी (काहुरखेडे, भुसावळ), गणेश यशवंत कोळी (चिंचखेडे बू, मुक्ताईनगर), काजी एजाजुद्दिन खलीलूद्दीन (यावल),




माध्यमिक विभाग
नितीन भास्कर झांबरे (अ.ध. चौधरी विद्यालय व ज्यु. कॉलेज डोंगर कठोरा, यावल),विजय राजकुमार मंगलानी (आर.एस.आदर्श हायस्कूल, भुसावळ), सुभाष रामदास महाजन (सरदार जी.जी. हायस्कूल अ‍ॅण्ड ज्यु.कॉलेज, रावेर), हेमंत सुधाकर देशपांडे (शिवाजी हायस्कूल, मुक्ताईनगर ),सुरेंद्र अशोक पाटील ( गो.द.ढाके विद्यालय, एनगाव,ता. बोदवड ),सुरेश आनंदा सुरवाडे (न्यु.इंग्लीश स्कूल, जामनेर)

खाजगी प्राथमिक विभाग
जियाउन्नबी मोहिबुर रहमान शेख ( अलहिरा उर्दु प्राथ. शाळा भुसावळ),
राजकुमार लिलाचंद जैन (श्री शिवप्रतिष्ठान रावेर संचलित सरस्वती विद्या मंदिर, रावेर), ज्ञानेश्वर हरीदास चौधरी (राष्ट्रीय शिक्षण संस्था, बोदवड)

महाविद्यालय विभाग
प्रा.डॉ.अविनाश एन.सोनार (श्री.व्ही.एस नाईक कॉलेज, रावेर), प्रा.नंदन वसंतराव वळींकार (अ.ध. चौधरी विद्ायालय व ज्यु कॉलेज, डोंगरकठोरे, यावल ), डॉ.प्रा.भाग्यश्री शैलेंद्र भंगाळे ( पी.ओ. नाहाटा कॉलेज भुसावळ )



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !