भुसावळात एक खिडकी योजनेचा दिलासा : सार्वजनिक मंडळांना एका छताखाली मिळणार परवानगी


भुसावळ : लाडक्या गणरायाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांची फिरफिर कमी करण्यासाठी भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एक खिडकी योजना सुरू केली आहे. शहर व बाजारपेठ हद्दीतील मंडळांना आवश्यक कागदपत्रे येथे सादर केल्यानंतर परवानगी दिली जाणार असल्याने मंडळ पदाधिकार्‍यांचा अन्य सरकारी कार्यालयात जाण्याचा मोठा त्रास कमी झाला आहे.

कमी वेळेत सुलभ प्रक्रिया
भुसावळ शहर व बाजारपेठ हद्दीतील ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना
यंदा श्रींची स्थापना करावयाची आहे त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ‘एक खिडकी योजना’ येथे कागद पत्रांची पूर्तता करून अर्ज करावा व संबंधित मंडळांना येथून परवानगी मिळेल, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. उत्सवासाठी परवानगीची प्रक्रिया अल्प वेळेत व सुलभ पद्धत्तीने मिळणार असल्याने लाभ घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !