प्रा.डी.एम ललवाणी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
भुसावळ : श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डी.एम.ललवाणी यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून संस्थेच्या अध्यक्षा संदीप वाघ यांनी कळविले आहे. प्रा.ललवाणी यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक,अध्यात्मीक कार्यात सहभाग घेतला आहे. आपल्या 32 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक विद्यार्थीनी उपयोगी उपक्रम पार पाडले आहेत. स्व.कपुरचंदजी कोटेचा व्याख्यानमाला, जैन संघटना उपक्रम, कर्मचारी पतपेढी ही त्यांच्या कार्याची मैलाची दगड ठरली आहेत. कोणत्याही शिक्षकाने आजतागायत न केलेलं कार्य म्हणजे आपल्या विद्यार्थिनींच्या कार्यावर पुस्तक लिहिण्याचं त्यांचा मानस आहे. हे पुस्तक लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. प्रा.ललवाणी यांच्या बहुविध कार्याचा सन्मान म्हणून संस्थेने त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे. हा पुरस्कार त्यांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.





