मोठा दिलासा : मंगळूरसह अभोडा व सुकी धरण शंभर टक्के भरले


रावेर : शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने रावेर तालुक्यातील मंगळुर, आभोडा, सुकी धरण शंभर टक्के भरले असून भोकर नदीला पाणी आले आहे. यामुळे पुनखेडा-रावेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रातीनंतर तालुक्यात पावसाने कमबॅक केले आहे. रावेर तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पावसाने झोडपले. जोरदार पावसाने रावेर तालुक्यातील मंगळुर, आभोडा, आणी सुकी धरण शंभर टक्के भरले असून भोकर नदीला पाणी आले आहे. यामुळे पुनखेडा-रावेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बर्‍याच दिवसांपासून रावेर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !