भुसावळात शिक्षकदिनी 185 शिक्षकांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान
भुसावळातील स्व.नारायण पाटील बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
भुसावळ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील जुना सतारे भागातील स्व.नारायण पाटील बहुउद्देशिय संस्थेतर्फे रविवारी भुसावळातील 185 शिक्षकांचा सहृदय सन्मान कर्तव्यदक्ष नगरसेवक मुकेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. कोरोनामुळे जाहिर कार्यक्रम न घेता गेल्यावर्षाप्रमाणे प्रत्येक भागात जावून शिक्षकांना गौरविण्यात आले. 5 सप्टेंबर शिक्षक दिनी गुरु – शिष्यांच्या नात्यांतील पवित्र परंपरा नगरसेवक पाटील हे जपत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





