नवउद्योजकांना महाराष्ट्र बँक अल्पदरात कर्ज देणार
बँक ऑफ महाराष्ट्रच्या पदाधिकार्यांची ग्वाही : भुसावळातील औद्योगिक वसाहतीला भेट
भुसावळ : विविध योजनांची दिली माहिती शहरातील खडका भागातील औद्योगिक वसाहतीला बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मॅनेजर रश्मी रेखा, वरी प्रबंधक अनिल कळकुंबे व मयंक गुप्ता यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी आमदार संजय सावकारे यांची प्रमुख उवपस्थिती होती. याप्रसंगी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित उद्योजकांना दिली. औद्योगिक वसाहतीत नव्यानेच प्लॉट घेतलेल्या नवउद्योजकांना बँकेतर्फे विविध योजनांनुसार कमीत-कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली.
विविध योजनांची दिली माहिती
औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू असलेल्या लघू उद्योजकांसाठीही विविध योजना उपलब्ध असून अल्प व्याजदरात कर्ज सबसिडी उपलब्ध असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. उद्योगाचा पूर्वी पेक्षा अधिक विस्तार होण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत बँक करणार असून उपस्थित उद्योजकांनी त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची योग्य ती पूर्तता करून बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे उद्योजकांना देण्यात येणार्या विविध योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.



उद्योजकांच्या शंकांचे निरसन
बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकार्यांनी प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीतील उद्योजक त्याचप्रमाणे स्थानिक नवउद्योजकांच्या विविध शंकांचे निराकरण करण्यात आले. यावेळी औद्योगिक वसाहतीत किंवा जवळच्या ग्रामीण परीसरात बँकेचे एटीएम सुरू करण्याची मागणी स्थानिक उद्योजकांनी केली. भेटीदरम्यान भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे हे उपस्थित होते. यावेळी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी विविध समस्या आमदारां समोर मांडल्या. रस्ते, पाणी, वीज, टॅक्स, लीजबाबतच्या अनेक समस्या या संबंधित मंत्र्यांकडे मांडणार असल्याचे आमदार म्हणाले. मुंबई येथे बैठक लावून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार म्हणाले.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला भुसावळ औद्योगिक वसाहत उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पुंडलिक चौधरी, सचिव जितेंद्र सरोदे, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल, शहर भाजपाचे सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, सुरतसिंग पाटील, रघुनाथ सरोदे, गोपाल पाटील, श्याम झोपे, सुजय झोपे, कोमल पाटील, महेश उदासी, नंदलाल पवार, श्याम झोपे, नरेंद्र सरोदे, प्रल्हाद अहिरे आदी उत्पादकांची उपस्थिती होती.


