भुसावळात बुधवारी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी
भुसावळ : टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 20 वी 19 वर्षाच्या आतील व 6 वी सीनियर मुला/मुलांची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा अमरावती येथे 12 ते 14 सप्टेंबर 2021 दरम्यान होत आहे. या स्पर्धेकरीता जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड बुधवार, 8 रोजी दुपारी एक वाजता शहरातील पु.ओ.नाहाटा कॉलेजच्या मैदानावर होत आहे. 19 वर्ष वयोगटासाठी 1 जानेवारी 2002 नंतर जन्मलेल्या इच्छुक खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे व अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा महासंघटनेचे अध्यक्ष प्रा.आमदार चंद्रकांत सोनवणे, डॉ.प्रदीप तळवलकर, शकील पटेल, प्रा.आनंद उपाध्याय, निना कटलर, गोपाल जोनवाल, रमण भोळे, प्रदीप साखरे, बी.एन.पाटील, राजू कुलकर्णी, मधुकर वाणी, अजय डोळे, मेघशाम शिंदे, राहुल कोळी, प्रतीक कुलकर्णी, तारीख अहमद यांनी केले आहे.





