वराडसीम येथे पोलिसांना शिविगाळ करीत सरकारी कामात अडथळा : एकाला अटक


भुसावळ : तालुक्यातील वराडसीम बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. सुनील प्रताप पाटील (38, वराडसीम, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सोमवारी पोळा सणानिमित्त तालुका पोलिसांचा गावात बंदोबस्त लावण्यात आला होता. सहा.निरीक्षक अमोल पवार, हवालदार युनूस मुसा शेख, हवालदार वाल्मीक सोनवणे, दीपक जाधव, राजेंद्र पवार, गणेश गव्हाळे, उमेश बारी व राहुल कडू महाजन हे बंदोबस्तावर असताना संशयीत सुनील पाटील हा बसस्थानक चौकात आरडा-ओरड करून शिविगाळ करीत असल्याने पोलिसांनी त्यास अडवल्यानंतर संशयीताने पोलिसांना शिविगाळ केली तसेच रस्त्यावर पडलेला दगड घेवून पोलिसांच्या अंगावर धावल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेत वाहनात बसवले. यावेळी संशयीताने वाहनाच्या दरवाजावर डोके आपटून घेतल्याने डोक्याला जखम झाली. या प्रकरणी संशयीताविरोधात राहुल महाजन यांच्या फिर्यादीनुसार शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !